श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते हिंगणगाव गटातील विविध विकासकामांचे उद्घाटन व सासवड येथे भव्य कार्यकर्ता मेळावा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते हिंगणगाव गटातील विविध विकासकामांचे उद्घाटन व सासवड येथे आज दि.१५ सप्टेंबर रोजी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील सुरवडी, बिबी, आदर्की बु., आळजापूर, कापशी, हिंगणगाव, टाकूबाईचीवाडी, सासवड आदी ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाट्न समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आज दुपारी १: ३० ते रात्री ९ वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी दिली. दुपारी १ : ३० वाजता सुरवडी, २:३० वाजता बिबी, ३:३० आदर्की, ४:३० वाजता आळजापूर (सभा), ५:३० वाजता कापशी, ६ वाजता हिंगणगाव, सायंकाळी ७ वाजता सासवड येथे कार्यकर्ता मेळावा असा भरगच्च कार्यकम होणार आहे.
यावेळी खालील विविध विकासकामांचे उदघाट्न व भूमिपूजन होणार आहेत. सुरवडी-खराडेवाडी-तडवळे ५ कोटी ६० लाख रुपये किंमतीच्या रस्त्याचे लोकार्पण, पवारमळा ५ सर्कल ४१ लाख रुपये ७ एम.एस.ई.बी. सबस्टेशन ३ कोटी ७९ लक्ष, मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन / ३ बंधारे १ कोटी ४० लक्ष, सासवड ते बडेखान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे ४ कोटी ५० लक्ष, सासवड ते घाडगेवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे २ कोटी, सासवड ते रासकर वस्ती रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे.इ. कामांचे भूमिपूजन होणार आहे.
No comments