अनुप शहा यांनी रोजचा भोंगा बंद करावा , जनता कंटाळली खोट्या आरोपांना ; तालुक्याचा विकास कोणी केला ते जनतेला चांगले ठाऊक आहे - प्रितसिंह खानविलकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - अनुप शहा यांनी रोजचा भोंगा बंद करावा, जनता कंटाळली आहे, त्यांच्या खोट्या आरोपांना, त्यांनी भान ठेऊन आरोप करावेत. आम्ही पण जशासतसे उत्तर द्यायला तयार आहे. आजवर तालुक्यात कोणी ‘जल क्रांती ’ केली कोणी ‘औदोगिक क्रांती, केली आणि कोणी ‘विकासकामे’ केली, हे जनतेला चांगले ठाऊक आहे’’, असा टोला राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी लगावला आहे.
फलटण शहरात कमिन्स कंपनी वरुन जे आरोप अनुप शहा यांनी केले, यांच्या टिकेला उत्तर म्हणून प्रितसिंह खानविलकर यांनी सदरचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे. कमिन्स इंटरनॅशनल कंपनी आहे, त्या मुळे ती सरकारच्या नियमाप्रमाणे चालते, त्यामध्ये कोणताही राजकिय हस्तक्षेप होत नाही, तसं असते तर कँटिंगचं काँट्रॅक्ट तुमच्या कार्यकर्त्यांना मिळालं नसतं, महाराज साहेबांच्या प्रयत्नानी आणलेली कंपनी आहे ,फलटण तालुक्याचं नंदनवन झालं, जिथे कोणी विचार करु शकत नाही तिथे, रोजगार निर्मिती झाली,कंपनी मध्ये पगार प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या स्किल वर मिळतो, उगाच इलेक्शन आलंकी, काहीतरी बिनबुडाचे आरोप करणे एवढेच काम विरोधकांना शिल्लक राहिलेले आहे. जर एवढा कळवला होता तर एवढ्या दिवस गप्पा का होता ? का कंपनी कडून मालिदा लाटत होता का ? हे असले पब्लिचिटी साठी स्टंट बाजी चालू आहे ती बंद करावी.
‘‘जनतेने तुमची जागा लोकसभा निवडणूकीत दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणूकीतही जनता तुम्हाला कात्रज चा घाट दाखवून देणार आहे. जर तुमच्या कार्यकर्तांची गुन्हे लिस्ट काढली तर खुण , खुनाचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग, खंडणी , हनी ट्रॅप इत्यादि गंभीर गुन्हे अहेत, तुमचा तर शंभर तोंडाचा रावण तयार होईल ,तुम्ही कितीही बेंबीच्या देठापासून खोटे आरोप केले तरी, यावेळेस तुम्हाला नक्की जनता घरी बसवणार आहे. आमचे नेते कायम जनतेच्या सेवेसाठी असतात कधी पक्षपात जातिभेद करत नाहीत. आमचे मित्र अनुप शहा यांनी नेत्याला खूश करण्यासाठी आपल्या आरोग्याकडे जस्त लक्ष द्यावे अशी उपरोधिक टिकाही प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे.
No comments