या वेळेस फलटणकरांचा उद्धार, बौद्ध आमदार ?
प्रश्न चिन्ह पाहून बऱ्याच जणांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले असतील, त्या पैकी काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच पुढे आपल्याला मिळतील. काहींना वाटत असेल कि, अस अचानक बौद्ध समाज आमदारकीसाठी उमेदवारीची मागणी कशी काय करू लागलाय ? सुरुवातीलाच, आपण सर्वानी लक्षात घेतले पाहिजे कि, लोकशाहीमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला, व्यक्तीगत स्वरूपात आणि सामाजिक स्वरूपात निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणे, निवडणूक लढवणे आदी अधिकार हे भारतीय राज्य घटनेनेच दिलेले आहे. त्याच अधिकाराचा एक भाग आहे की, बौद्ध समाज हा उमेदवारीची मागणी करीत आहे. ही केलेली मागणी पाहून, साहजिकच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतील.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बौद्ध आमदारच का ? बौद्ध समाजाचे मुळीच असे म्हणणे नाही की, बौद्ध आमदार हा जादूची कांडी फिरवून लगेचच चुटकीसरशी फलटण मतदार संघातील सर्व समस्या नाहीश्या करेल किंवा फक्त बौद्ध सामाज्याच्याच सर्व समस्या लगेचच नाहीश्या करेल, त्यांचाच उद्धार होईल असेही नाही. परंतु, बौद्ध सामाज्याची लोकसंख्या पाहता, तसेच या सामाज्याने एकत्रित येऊन प्रभावीपणे केलेली मागणी, त्यांनी आत्तापर्यंत केलेले प्रयत्न आदीकडे मुळीच दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे, अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या विधानसभा मतदार संघात, एखाद्या मोठ्या पक्षाने बौद्ध समाजातील, उमेदवारास प्राधान्य देण्यास काहीच हरकत नसावी.
जर बौद्ध समाज्यातील उमेदवार द्यायचाच झाला तर तो उमेदवार कसा पाहिजे ? बौद्ध समाजातील एका चांगल्या, शिक्षित इतर सर्व सामाजासही स्वीकार होईल तसेच मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे हित पाहून योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करू शकणारा, नेतृत्वगुणसंपन्न आणि निस्वार्थी व्यक्तीस उमेदवारी द्यावी. असा उमेदवार दिल्यास, नक्कीच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील लोक अश्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.
बौद्ध समाज्यातील उमेदवाराचा आग्रह धरला जातोय म्हणजे , बौद्ध समाज हा इतर जाती धर्माचा, सामाज्याचा तिरस्कार करतोय का ? तसे मुळीच नाही , त्यामुळे तसा काही गैरसमज कोणीही करून घेऊन नये. कारण आतापर्यंत , फलटण मधील बौद्ध समाज हा फलटण मधील इतर सर्व जाती धर्मातील लोकांना नेहमीच आपले बांधवच समजत आलेला आहे, समजतोही आणि यापुढेही समजत राहील . कारण आपण सर्वांनीच पाहिलेले आहि की , फलटण विधानसभा मतदार संघातील लोकांच्या हितासाठी , मागील पंधरा वर्ष व त्याच्याअगोदरही बौद्ध सामाज्याने नेमहीच सामंज्यस्यची भूमिका घेतली आहे आणि इतर समाज्यातील बांधवाना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली असताना त्यांना पाठिंब्यासहीत, भरघोस मतदान करून निवडूनही आणले आहे.
आणखी एक प्रश्न म्हणजे, असं काय करेल हा होणारा बौद्ध आमदार ? आपण, लक्षात घेलले पाहिजेकी, येणाऱ्या काळात फलटणचा उद्धार होणे हे प्रामुख्याने पाहून यावेळेस बौद्ध समाज्याच्या उमेदवारास एक संधी दिल्यास, असा उमेदवार नक्कीच स्वाभिमानाने , आपले व्यक्तिगत हित बाजूला ठेऊन, फलटणकरांच्या उद्धारासाठी, फलटणकरांच्या वेगेळ्या समस्या सोडवण्यासाठी , त्यांना न्याय देण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करेल. तसेच वेळोवेळी गरजेनुसार फलटण करांच्या हिताचे निर्णय घेऊन, त्याची अमंलबजावणीही करेल आणि येणाऱ्या काळात फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा सकारात्मक कायापालट झालेला आपण सर्व जण पाहू.
वरील सर्व बाबींचा विचार करता, जर कोणत्याही मोठ्या पक्षाने बौद्ध समाज्यातील उमेदवारास या वेळी संधी दिल्यास, नक्कीच भरघोस मताने निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त असेल, ह्या बाबत कोणतेही दुमत नसावे. त्यामुळे, शेवटी एवढेच म्हणावेच लागेल कि, ह्या वेळेस फलटणकरांचा उद्धार बौद्ध आमदार.
No comments