Breaking News

मिरवणुकीत कर्कश्य आवाजामुळे १० डीजे वर पोलिसांची कारवाई

Police action against 10 DJs due to loud noise in the procession

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - गणरायाची प्रतिष्ठापना करताना काढलेल्या मिरवणुकी प्रसंगी लावण्यात आलेल्या डीजेच्या कर्कश्य आवाजामुळे, अनियंत्रीतपणे ध्वनीक्षेपक लावल्या प्रकरणे फलटण शहर पोलिसांनी १० डीजे मालकांच्या विरोधात कारवाई केली आहे.

    फलटण प्रशासनाने गणेशोत्सव २०२४ च्या अनुषंगाने दि.३१/०८/२०२४ रोजी फलटण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन, गणेशात्सवाचा आनंद समाजातील सर्व जनतेस आनंदाने घेण्यात यावा आणि सदर उत्सव शांतता, सलोख्याने, सामंजस्याने पार पाडावा, यासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापराच्या मार्गदर्शनासहीत अन्य सुचना दिलेल्या होत्या.

    या पार्श्वभुमीवर दि.०७/०९/२०२४ रोजी फलटण शहरात श्री गणेश चतुर्थीच्या निमीत्ताने अनेक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेश मुतीच्या आगमनाच्या प्रित्यर्थ मिरवणुका काढल्या होत्या. या मिरवणुकांमध्ये खालील मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा अनियंत्रितपणे वापर केल्याने, त्यांच्या विरुध्द कलम ३६ (इ-अ)/१३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

    खाली गणेशोत्सव मंडळाचे नाव व डीजे मालक चालकाचे नाव दिले आहे.
१) श्रीमंत जय श्रीराम गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक - शामराव तानाजी अहीवळे, रा. स्वारगेट पोलीस लाईन, पीएसआय क्वार्टर्स, पुणे.

    २) सोमवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक अथर्व राजेश चौगुले, रा. कात्रज, पुणे

    ३) उमाजी नाईक चौक गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक शोएब निजाम आत्तार, रा. गजानन चौक, फलटण, ता. फलटण, 

    ४) दगडी चाळ गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक तुकाराम दादासोो शिंदे फलटण

    ५) लक्ष्मीनगर येथील एकदंत गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक अभिषेक कालीदास जगदाळे, रा. दहीवडी, ता. माण 

    ६) मोती चौक तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक रुतुराज रामचंद्र सरगर,  रा. ओल्ड एमआयडीसी, धनगरवाडी, सातारा, जि. सातारा.

    ७) छत्रपती शिवाजीनगर तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक प्रदीप बापूसाहेब जगताप रा. विद्यानगर, फलटण, जि. सातारा

    ८) सिध्दीविनायक महागणपती मंदिर गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक शामकुमार उत्तम काकडे,  रा. स्वामी विवेकानंद नगर, फलटण, 

    ९) बाल गणेश गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक राजेंद्र प्रकाश जाधव,  रा. सुंदरनगर, लोणंद, ता. खंडाळा, जि.

    १०)  अमर ज्योत गणेशोत्सव मंडळ, फलटण डीजे मालक (१)  ध्वपीक्षेपक चालक योगेश  बाळकृष्ण पोंदे,  रा. फलटण, जि. सातारा सगुणामातानगर, जिंती नाका, फलटण, जि. सातारा. (२) अमर ज्योत गणेशोत्सव मंडळाचा पदाधिकारी राहुल रामभाऊ जगताप,रा. फलटण,

    वरील मंडळावर मुंबई पोलीस अधिनियम कायद्याप्रमाणे कारवाई केल्याबरोबरच ध्वनीक्षेपकासाठी वापरण्यात येणारे ५ मिक्सर सेट ताब्यात घेतले आहेत.

    वरील कामगिरी सपोनि. नितीन शिंदे, पोह. चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, पोशि. मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके वगैरे यांनी सहभाग घेतला.

    आगामी कालावधीतही फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन कारवाई करण्यात येणार आहे.

    या पार्श्वभुमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांना आवाहन करण्यात येते की, गणेशोत्सवाचा आनंद सर्व जनतेस आनंदात व उत्साहात घेता यावा, जनतेस त्रास होणार नाही आणि परवानगी मध्ये दिलेल्या क्षमतेच्या मर्यादे पर्यंतच धनीक्षेपकाचा आवाज नियंत्रीत ठेवावा, गणेशात्वाच्या निमीत्ताने विधायक किंवा लोकोपयोगी आणि आदर्श घेण्याजोगे तसेच मंडळाचे नावलौकिक वाढविणारे उपक्रम राबवावेत.

No comments