Breaking News

प्रियांका येळे यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालयात नियुक्ती

Priyanka Yele appointed in Maharashtra State Sports and Youth Directorate

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ -  साखरवाडी ता. फलटण येथील साखरवाडी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा राष्ट्रीय खेळाडू सौ. प्रियांका येळे - केसकर हिची राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनायामध्ये खेळाडू प्रवर्गातून थेट नियुक्ती करण्यात आली आहे.

    सौ. प्रियांका येळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साखरवाडी विद्यालय, साखरवाडी या ठिकाणी झाले असून, तिने खो- खो खेळामध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. भारत सरकारच्या दर ४ वर्षांनी होणाऱ्या नॅशनल गेम्समध्ये २०१५ सालच्या खेळामध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत प्रियांकाची थेट नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments