Breaking News

मलठण गणेशोत्सव मंडळ येथे अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम

Program of Atharvashirsha Pathan at Malthan Ganeshotsav Mandal

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - मलठण गणेशोत्सव मंडळ, मलठण मंडळ यंदा २७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे, आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य हालते देखावे तसेच पॅरिसचा आयफेल टॉवर व अनेक मंदिरांची प्रतिकृती उभारण्याची परंपरा असलेले मलठण गणेशोत्सव मंडळ यावर्षी भव्य विठ्ठल मंदिराचा देखावा सादर करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री. अभिजीत नाईक निंबाळकर उपाध्यक्ष श्री. जयवंत शिंदे व बबलू पवार, सचिव श्री. अमोल घाडगे व आशिष भोसले तसेच खजिनदार ओंकार गायकवाड या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सभासद यांच्या सहकार्याने मलठण गणेशोत्सव मंडळ यंदाही फलटण तालुका महिला वारकरी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते ८ अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी सर्व महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ. विजयाताई जाधव यांचे मार्फत लकी ड्रॉ पद्धतीने अकरा पैठणी साड्यांची भेट देण्यात येणार आहे.

No comments