Breaking News

शिक्षणातील पुरोगामीत्व व आधुनिक शिक्षण प्रणालीचे जतन केले पाहिजे - प्रा.डॉ. अनिल टिके

Progress in education and modern education system should be preserved - Prof. Doanil Tike

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.7 - भारतीय शिक्षण प्रणालीला जरी मोठा इतिहास असला तरी सद्यस्थितीत शिक्षणातील पुरोगामीत व आधुनिक शिक्षण प्रणालीचे जतन  करणे शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनमोल कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मधोजी महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. अनिल टिके यांनी फलटण येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ कदम होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.प्रभाकर पवार,प्रोफेसर डॉ.अशोक शिंदे व प्रा.शैला शिरसागर होत्या. 

    मुधोजी महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाने आयोजित केलेल्या 'शिक्षण दिन गौरव सोहळा',या कार्यक्रमात प्रा. डॉ.अनिल टिके पाहुणे म्हणून बोलताना पुढे म्हणाले,शिक्षण हा मानवी विकासाचा मानबिंदू आहे. शिक्षणातून माणूस माणसात राहतो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. शिक्षक हते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास अतुलनीय आहे त.त्यांनी अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून शिक्षण क्षेत्रात इतिहास घडवला.याचा आदर्श भारतीय संस्कृती जपून विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.

    प्रमुख उपस्थितीमध्ये बोलताना प्रोफेसर डॉ.प्रभाकर पवार म्हणाले ,डॉ.राधाकृष्णन यांनी पूर्व पश्चिम असा फुल बांधून भारतीय तत्त्वज्ञान व शिक्षण प्रणालीला एक आधुनिक बाज तयार करून दिला.महात्मा फुले यांनी अस्पृश्य व स्त्री शिक्षणाचा पाया रचला .बहुजन समाजाला शिक्षण मिळून त्यांचे आयुष्य उजळावे म्हणूनफुले दाम्पत्याचनी उभे आयुष्य जीव पाखडला.भारत ही बुद्धांची भूमी असून बुद्धाच्या करुणेचा स्पर्श डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी रशियाचे राजदूत असताना स्टॅलिनला केला,तेंव्हा त्याच्यातील प्रज्ञा,शील,करुणेची माणुसकी जागी झाली.मानवता हा मोठा धर्म असून प्रत्येक मनुष्याने ज्ञानगंगा व मानवता यांची सांगड घालून आपला जीवन प्रवास करून भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे.असे सांगितले. 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.शैला क्षीरसागर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रोफेसर डॉ.प्रभाकर पवार यांनी करून दिली.कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी  विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे फलक लेखन प्रा. ललित वेळेकर यांनी सुवाच्छ अक्षरात केले.शेवटी कु.प्रियंका विद्यार्थिनींने आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

No comments