Breaking News

मा.खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून आज पासून फलटण व माण तालुक्यासाठी MH 53 ची सेवा उपलब्ध - अमोल सस्ते.

Ranjitsih Naik Nimbalkar MH 53 service available for Phaltan and Man taluk from today - Amol cheap

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.5 - फलटण व माण तालुक्यातील जनतेला आरटीओ  कार्यालयासाठी सातारा येथे हेलपाटे  मारावे लागत होते याबाबत माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून, फलटण तालुक्यामध्ये आरटीओ कार्यालय सुरू केले व जनतेची सोय या निमित्ताने झाली. अनेक संघर्ष करून हे कार्यालय रणजितसिह यांनी जनतेसाठी सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला साताऱ्याचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. वेळ व पैसा यामुळे वाचला आहे. त्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सहकार्य या निमित्ताने लाभले आहे. आज फलटणला स्वतंत्र एम एच 53 हा नंबर आजपासून सुरू झालेला आहे, तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन भाजपा मंडल अध्यक्ष अमोल  सस्ते यांनी केली आहे.

No comments