महाराष्ट्र राज्य मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी मुधोजी महाविद्यालयाच्या अॅथलेटिक्स ट्रेनिंग सेंटरच्या खेळाडूंची निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. २५ : छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे दि. 04 व 05 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या सातारा जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे कु. सार्थक दत्तात्रय भोईटे ( एन.सी.सी. कॅडेट्स ) याने 18 वर्षाखालील गटात 200 मी.धावणे - प्रथम क्रमांक व 400 मीटर धावणे - द्वितीय क्रमांक मिळविला, कु. नवनाथ बापूराव दडस (एन.सी.सी. कॅडेट्स) याने 20 वर्षाखालील गटात 1500 मी. धावणे द्वितीय क्रमांक व 3000 मीटर स्टीपलचेस धावणे - द्वितीय क्रमांक मिळवला. मुधोजी महाविद्यालयच्या अॅथलेटिक्स ट्रेनिंग सेंटर वरील कु. प्रथमेश निंबाळकर याने 18 वर्षाखालील गटात 200 मी.धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. या तिन्ही खेळाडूंची पुणे येथे 22 ते 24 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या 38 व्या. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच नुकत्याच डेरवण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित मैदानी स्पर्धेमध्ये कु.संस्कार पिंगळे यांनी 1500 मी.धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक व कु. साहिल शिंदे यांने 800 मी. धावणे क्रीडा प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला .कु. आयुष शिरतोडे व कु. अंशुमन सुळ याने 4× 100 मी.रिले धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. या खेळाडूंना श्री. राज जाधव व श्री. तायाप्पा शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले .या यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम सर ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.डी.एम .देशमुख फ.ए.सो. क्रीडा समितीचे ज्येष्ठ सदस्य, श्री. शिरीष वेलणकर ,श्री. महादेव माने, श्री. संजय फडतरे, क्रीडा समितीचे सचिव श्री. सचिन धुमाळ यांनी हार्दिक अभिनंदन केले.
No comments