धनगर आरक्षणाबाबत राज्याने केंद्राकडे शिफारस करावी - धनगर समाजाच्या राज्यव्यापी आमरण उपोषण स्थळी रणजितसिंह यांची भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) पंढरपूर येथे सकल धनगर समाजातील कार्यकर्ते आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसले आहेत. या उपोषण स्थळाला मा. खा.रणजीतसिह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली व उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले की, मी कायमच धनगर समाजाच्या पाठीशी उभा राहिलो आहे, मी लोकसभेत सुध्दा धनगड व धनगर या शब्दा बाबत आवाज उठवला होता. हा समाज अर्थिक दुष्टया अडचणीत आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका माझी राहणार आहे.
धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी या मागणीकडे रणजीतसिंह यांचे लक्ष वेधले असता, रणजीतसिंह म्हणाले की, हा प्रश्न केंद्राकडेच येणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी अश्या मताचा मीही आहे, धनगर व धनगर या शब्दात दुरुस्ती करावी अशी माझी आग्रही मागणी आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे व लतीफभाई तांबोळी उपस्थित होते.
No comments