स्वरा भागवतला खेलो इंडिया अंतर्गत सायकलिंग मध्ये गोल्ड मेडल
गोखळी (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. २५ : - फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील तिरंगा पब्लिक स्कूल गोखळी ता.फलटण येथे शिकणाऱ्या स्वरा योगेश भागवत वय ११ वर्ष हिने बारामती येथे खेलो इंडिया अंतर्गत झालेल्या सायकलिंग कॉम्पिटिशन मध्ये १५ वर्षा अंतर्गत गोल्ड मेडल पटकवाले. स्वराने सहाव्या वर्षी एका मिनिटात १०० पुशप्स, ५० प्रकारचे रोप जम्प, प्राणायाम, योगासने, स्विमिंग.नियमित व्यायाम करण्यात तरबेज आहे. सहाव्या वर्षी १४३ किलो मीटर गोखळी, बारामती, मोरगाव, जेजुरी,निरा, लोणंद, फलटण,राजाळे,गोखळी असा सायकल चालविण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर एक तास छप्पन मिनिटांत लहान वयात सर करणारी स्वरा भागवत एकमेव मुलगी आहे.तिची या विक्रमी कामगिरीची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
या वेळी स्वराचा सत्कार जयदादा पवार तसेच महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशनचे चिफ प्रताप जाधव सर यांनी केला. या यशाबद्दल कु. स्वरा भागवत चे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी आणि पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
No comments