पत्रकारांवर बिनबुडाचे आरोप केल्याने डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची फलटण कार्यकारणी बरखास्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 19 : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या फलटण येथील पदाधिकाऱ्यांनी काही पत्रकारांना मुद्दामून उद्देशून निवेदन दिले होते. यासोबतच फलटणचे पदाधिकारी हे पार्टीचा कोणताही प्रोटोकॉल पाळत नसल्याने जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी फलटणची कार्यकारणी बरखास्त करत पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत प्रसिद्धीपत्राद्वारे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी माहिती दिली.
जिल्हाध्यक्ष गायकवाड प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणाले की; डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे फलटणचे जे पदाधिकारी होते त्यांनी केलेल्या कृतीचा व पार्टीचा काडीमात्र संबंध नाही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामध्ये फलटण तालुक्यातील सर्व पत्रकार हे दक्ष राहून कामकाज करीत असतात. पार्टीचे नाव व लेटरहेड वापरून केलेल्या कृत्याबद्दल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, सातारा जिल्ह्याचे वतीने जाहीर माफी मागत अश्या कृत्ये करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा यावेळी निषेध व्यक्त केला.
No comments