भाजप कामगार आघाडी सेलच्या शहर उपाध्यक्ष पदी विक्रांत काकडे यांची निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचने नुसार भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सेलच्या शहर उपाध्यक्ष पदी विक्रांत मधुकर काकडे यांची निवड करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते विक्रांत काकडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धयौशिल कदम,भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पुर्वचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे,पश्चिम तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, मा.नगरसेवक दत्ता अहिवळे, मा.नगरसेवक सचिन अहिवळे,मध्य रेल्वे मंडळाचे सल्लागार रियाजभाई इनामदार व मंगळवार पेठेतील भारतीय पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
No comments