जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी सरडे येथील ६ जनावर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - जुन्या वादाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून, एकास मारहाण केल्या प्रकरणी सरडे ता. फलटण येथील सहा जणांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम व अन्य कालमान्वये फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
राहूल भिमराव जाधव, गौरव बाळासो भंडलकर, रोहित भिमराव जाधव, ऋतिक दत्तू जाधव, विशाल बाळासो भंडलकर, सुनील मोहन जाधव सर्वजण रा. सरडे ता. फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अमित अशोक खवळे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्याचे मालक छगन मदने व राहूल जाधव यांच्यात जुना वाद आहे. त्या वादाच्या कारणावरून वरील संशयित आरोपीनी त्यांना दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास जाधव वस्ती, सरडे येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. पुढील तपास पोलिस उप अधिक्षक राहूल धस करीत आहेत.
No comments