Breaking News

अजित पवारांकडून फलटण मध्ये सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी

Ajit Pawar nominated Sachin Kamble Patil in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ – फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाची  जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली असून,   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सचिन सुधाकर कांबळे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले असून, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

    फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भाजपचे फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे फलटण विधानसभा मतदारसंघ दोन राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत प्रमुख लढाई होणार आहे.

    फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी घोषित केले होती, मात्र आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी धुडकावून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हाती तुतारी घेतली होती, त्यांच्या उमेदवारीची कालच अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे.

No comments