सासकलच्या विधायक विकासासाठी कायम कटिबद्ध - दीपक चव्हाण
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० - २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राजे गटाचे पुरस्कृत व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण हे मौजे सासकल येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क दौऱ्या दरम्यान ग्रामस्थांना संबोधित करत होते ते म्हणाले," मौजे सासकल गावाने कायमच माझ्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.तेव्हा या निवडणुकीतही सर्व ग्रामस्थांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे. माझी निशाणी तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून, मला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन मी करत आहे. मी कायम सासकलच्या विधायक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दीपकराव चव्हाण यांनी केले. ते पुढे म्हणाले मी केलेल्या कामाचा पाढा वाचण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मी केलेली काम तुमच्यासमोर आहेत. तेव्हा आपण मला पुन्हा संधी द्यावी असे आवाहन दीपक राव चव्हाण यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले," ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही. ही निवडणूक विधानसभेचे आहे. गाव पातळीवरील दोन्ही गटांनी एकत्रित येऊन, आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आपण दिलेला उमेदवार हा तुमच्या समोर आहे. गेल्या पंधरा वर्षात त्यांनी आपल्या सुसंस्कृतपणाचे दर्शन आपल्या वागण्या, बोलण्यातून सर्वांना दिले आहे. थोरा मोठ्यांशी कशा पद्धतीने वागावे व वाड्या वस्त्यांचा विकास कशा पद्धतीने करता येईल, याचाच विचार त्यांनी नेहमी केला. आणि म्हणून पुन्हा त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्वांची आहे. सर्वांनी तुतारी या चिन्हाचा प्रचार करून आपल्या उमेदवाराच्या विजयाचे भागीदार व्हा. लवकरच येणाऱ्या काही दिवसात आपण एक जाहीर प्रचार सभा घेणार आहोत.यावेळी त्यांच्या समवेत सह्याद्री चिमणराव कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, भाडळी बु.गावचे सरपंच वसंतराव मुळीक हेही उपस्थित होते.
यावेळी गावच्या वतीने झालेल्या कामांविषयी सामाजिक कार्यकर्ते सोमिनाथ घोरपडे यांनी माहिती दिली व नियोजित कामे ही सांगितली ते म्हणाले,गावासाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी खूप कामे दिली आहेत. साकव पुल, सभा मंडप, विद्युत खांब व लाईट जोडणी, बंधारे,शाळेच्या वर्गखोल्या, दोन्ही स्मशान भूमी, डांबरीकरण - सासकल पाटी ते सासकल गावठाण रस्ता, सासकल ते धुमाळवाडी जाणारा रस्ता,पाण्याची नवीन टाकी,अंतर्गत बंदिस्त डांबरीकरण अशी विविध कामे झाली.फक्त तेल्याच्या मळ्यातील आठशे मीटर राहिलेले डांबरीकरण तातडीने करून घ्यावे अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी या छोटेखानी संवाद सभेचे प्रास्ताविक अनिरुद्ध मुळीक यांनी केले. यावेळी गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी आडके,चांगुणा मुळीक, लता मुळीक, मोहन मुळीक, माजी सरपंच लक्ष्मण मुळीक, सोपान मुळीक, नामदेवराव दिनकर मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, दत्तात्रय दळवी, विनायक संभाजी मुळीक, चंद्रकांत गोपाळ मुळीक, सदानंद निळकंठ मुळीक, युवा उद्योजक लहूराजे सावंत, हिरामण मुळीक, विकास मुळीक, राजेंद्र फुले, किसन चांगण, नामदेव चांगण, लालासो सावंत, मोहन सावंत, सर्जेराव मुळीक, ज्योतीराम मुळीक, संतोष सुतार, सचिन मुळीक, अर्जुन फरांदे, दिनेश मुळीक, मनोहर मुळीक, सुभाष मुळीक, शिवाजी सावंत, शिवाजी चांगण, मोहन गोपाळ मुळीक, रमेश आडके, उमाजी आडके,अक्षय घोरपडे,शंकर गोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते.
No comments