अशोक काकडे यांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व चंदन काकडे (वस्ताद) यांचे वडील अशोक शंकर काकडे यांचे अल्पशा आजाराने दि ३०/९ २०२४ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे, बहिण असा परिवार आहे.
दि. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी धम्मदिक्षा दिली, त्या ठिकाणी शंकरराव काकडे त्यांचे वडिल दोन्ही पायांनी अपंग असताना त्या ठिकाणी दिक्षा घेण्यासाठी गेले होते.अशोक काकडे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण तालुका, शहर व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
No comments