लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळावा ; मा.खा.रणजितसिंह निर्णय जाहीर करणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदानावर सकाळी १० वाजता लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदारकीच्या उमेदवारीबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदानावर २० हजार लोकांचे शक्तिप्रदर्शन करत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याने मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
No comments