आ.दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे, अनिकेतराजे, विश्वजितराजे यांच्यासह पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा दि.१४ रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फलटणमध्ये मोठा धक्का बसला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा, खा. शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश होणार असून यावेळी जाहीर सभा होणार आहे.
No comments