आज फलटण येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - आज दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता, मान्यवरांचा हस्ते फलटण येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा खासदार छत्रपती उदयनराजे भोंसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या शुभहस्ते व विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. याप्रसंगी नितीन लक्ष्मणराव जाधव (पाटील) खासदार, राज्यसभा, आ.बाळासाहेब शामराव पाटील माजी मंत्री, सहकार व पणन, महाराष्ट्र राज्य.,आ. शशिकांत शिंदे माजी मंत्री, जलसंपदा, मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील) आमदार, वाई विधानसभा मतदार संघ., श्रीमंत सत्यजीतसिंह विक्रमसिंह पाटणकर संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि., सातारा., श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर मा. सभापती, पंचायत समिती, फलटण, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर मा. नगरसेवक, फलटण नगरपरिषद, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर संचालक, गोविंद मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्टस्, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे.
गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, मुधोजी क्लब समोर, फलटण येथे अनावरण सोहळा संपन्न होत असल्याची माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, फलटण कडून कळवण्यात आले आहे.
No comments