उद्या फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह यांची जाहीर सभा व विकासकामाचे भूमिपूजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरात व ग्रामीण भागात अनेक विकासकामे मंजुर केली आहे, त्यापैकी आसु ते वारूगड रस्त्यासाठी २८६ कोटी, फलटण शहरातून जाणारा पालखी महामार्ग ७५ कोटी व अंतर्गत शहरातील विविध रस्त्यासाठी वैशिष्ट्ये पुर्ण योजने अंतर्गत २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत, तसेच पीएमजेएसवाय अंतर्गत विविध विकासकामासाठी २५ कोटी व फलटण तालुक्यांमध्ये बजेट मधुन २५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत, या कामाचे भूमिपूजन दि.१४/१०/२०२४ रोजी करण्यात येणार आहे. शहरातील विविध रस्ता व इतर भुमिपुजन करून, सायंकाळी ६ वाजता, गजानन चौक, फलटण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेस प्रल्हादराव साळुंखे पाटील, सचिन कांबळे पाटील व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटनेते अशोकराव जाधव, मंडल अध्यक्ष अमोल सस्ते ,शहराध्यक्ष अनुप शहा , पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे यांनी केले आहे
No comments