कास पठारावरील दुर्मिळ फुलझाडांना जिओ टॅगिंग
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - जागतिक वारसास्थळ असणार्यार कास पठरावर दुर्मिळ फुलझाडे आढळतात. या फुलझाडांना जिओ टॅगिंग करण्याची संकल्पना सातारा वनविभागाने हाती घेतली आहे. या प्रत्येक झाडाची शास्त्रीय माहिती, प्रदेशनिष्ठ महत्व पर्यटकांना कळावे, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
कासचे पठार सातार्यारच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किलो मीटर अंतरावर आहे. या पठारावर पावसाळा सुरु झाला की, असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मिळ वनस्पती येथे सापडल्याने या पठाराचा 2012 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणार्यास विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी कास प्रसिध्द आहे. या पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आढळतात. कासवर इंटरनॅशनल युनियन फॉर कांन्झरर्वेशन ऑफ नेचर अॅिन्ड नॅचरल रिसोर्सेसच्या प्रदेशनिष्ठ यादीमधील नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या 280 पुष्प प्रजातींपैकी 39 प्रजाती आढळतात.
कास पठारावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. कास पुष्प पठारावरील वातावरण सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये रंगीबेरंगी होत असते. पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांची फुले पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. ही फुले हातात घेऊन मिरविण्याचा मोह पर्यटकांना होत असतो. मात्र, निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने सतत करण्यात येत असते. कास पठारावर काही प्रमाणात अभ्यासू पर्यटकही येतात. मात्र, लाखोंच्या संख्येने येणारे अनेक पर्यटक हे पुष्पपठार पाहून सुखावतात. मात्र, फुलांची शास्त्रीय नावे (बॉटॅनिकल नेम) काय असावीत? असा प्रश्न त्यांना पडत असतो.
हे लक्षात घेऊन कास पठारावर गालिचा पसरणार्याप या पुष्प वनस्पतींच्या ठिकाणांचा अंदाज घेऊन या ठिकाणी नावांचे टॅग देण्याचा संकल्प वनविभागाने हाती घेतलेला आहे. पुढील वर्षापासून कास पठारावर येणार्याग पर्यटकांना वनस्पतींच्या नावांच्या टॅगमुळे पर्यटकांना वनस्पतींची शास्त्रीय माहिती मिळू शकणार आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. ऑगस्टमध्ये उगवणार्या् वनस्पतींचे आयुष्य ऑक्टोबर महिन्याअखेरपर्यंत राहते. या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने झाडांना टॅगिंग करताना सिंथेटिक कागदाचा वापर करावा लागणार आहे.
कास पुष्पपठारावर विविध पुष्पजाती आढळतात. सातारा परिसरात भेट देणार्या अनेक पर्यावरण प्रेमींना प्रत्यक्ष जागेवर असताना विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती होण्यासाठी जिओ टॅगिंग करण्याचा आमचा संकल्प आहे. याचा फायदा पर्यटकांना निश्चितपणे होईल असे उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी सांगितले.
Post Comment
No comments