काळूबाईनगर नवरात्र उत्सवास घटस्थापनेने प्रारंभ - अशोकराव जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळ, मलठण दरवर्षी प्रमाणे दिनांक 3/10/2024 रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना ने सुरूवात करण्यात आली.नवरात्र उत्सवात दररोज मनोरंजनाचे संगीत खुर्ची, चित्र कला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हास्य नगरी, भारुड, तसेच दांडिया अश्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन व होम मिनिस्टर खेळ पैठणी चा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दररोज रात्री ८ वाजता आरती व त्यानंतर रोजचे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
दसऱ्याला काळूबाई देवीची पालखी निघते. फलटण मधील शिवरुद्र झांज पथक या पारंपारिक वाद्यात पालखी मिरवणूक मलटण मधून सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून आरती नंतर नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. या वेळी आकर्षक दारूगोळा उडविला जाणार आहे.
हे सर्व कार्यक्रम काळुबाईनगर नवरात्र उत्सव महिला समिती काळूबाई नगर यांचे मार्फत मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत.
No comments