कापशी येथील राजे गटाचा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - कापशी ता.फलटण येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी संतकृपा उद्योग समूहाचे चेअरमन विलासराव नलवडे व भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष अमोल सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील राजभवन या निवासस्थानी जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विकास दादासोखताळ, मंगेश वरपे, तुकाराम काळे, हनुमंत मसुगडे, लखन दडस, महेश वरपे यांची उपस्थिती होती.
कापशी येथून विकास सोसायटीचे माजी चेअरमन पोपट कदम, कापशीचे माजी उपसरपंच रमेश बोबडे, माजी उपसरपंच बाळासाहेब अडसुळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब खताळ, रामदास भुजबळ, राहुल कदम, रमेश हनुमंत बोबडे, प्रताप हिराचंद बोबडे, अजित पोपट कदम, निखिल दिलीप पवार, हर्षद पोपट कदम, संकेत कुमार भोसले, अंकुश रामचंद्र कदम यांचे पक्ष प्रवेश संपन्न झाले आहेत.
No comments