प्रदिप झणझणे यांचा भाजपमध्ये प्रवेश
Pradip Zanzane joins BJP
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ -फलटण तालुका शिवसेना उबाठा गटाचे माजी तालुकाप्रमुख व लढवय्ये कार्यकर्ते प्रदीप झणझणे यांनी आज मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.फलटण तालुक्यामध्ये, या वेळेला आमदार बदलायचा, या संकल्पनेतून आज प्रदीप झणझणे यांनी प्रवेश केलेला आहे. फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये हा एक चांगला निर्णय झालेला आहे, कायम शेतकरी, शेतमजूर, जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
यावेळी प्रदीप झणझणे यांनी सांगितले की, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायला सुरुवात झालेला आहे, या तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक हा दादांवर विश्वास ठेवून, या तालुक्याचा खरं विकास होऊ शकतो, म्हणूनच मी आज शिवसेना उबाठा गटाला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सचिन कांबळे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, अभिजित नाईक निंबाळकर, राजेंद्र काकडे, विक्रांत झणझणे, विशाल नलवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments