विधानसभा निवडणुकीबाबत मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी दि.८/१०/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता हाँटेल निसर्ग सुरवडी येथे मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील सर्व प्रमुख नेते , पदाधिकारी , आघाडी मोर्चा, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडल अध्यक्ष बजरंग गावडे व अमोल सस्ते यांनी केले आहे.
No comments