फलटण ग्रामीण हद्दीत पॅरामिलिटरी फ़ोर्स व फलटण ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सचे जवान तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांनी विडणी, राजळे, साखरवाडी, खटकेवस्ती, बरड या भागामध्ये संयुक्तपणे रूट मार्च केला. या रूट मार्च दरम्यान प्यारा मिलिटरी फोर्सच्या जवानांना संपूर्ण तालुक्यातील जिओग्राफी बाबत माहिती देण्यात आली, तसेच बारीक-सारीक गोष्टींबद्दलही त्यांना माहिती करून दिली.
निवडणूक काळात हे पॅरामिलिटरी फोर्स चे जवान फलटण ग्रामीण हद्दीत उपस्थित राहणार आहेत.निवडणूक काळामध्ये कोणत्याही प्रकारची शांतता सुव्यवस्था निर्माण करणारे, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे पोलीस दल स्थानिक पोलिसांच्या मदतीने काम करणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक पाटील तसेच पोलीस ठाण्याकडील एकूण दहा कर्मचारी आयटी बीपी चे इन्स्पेक्टर अमित शर्मा तसेच साठ जवान उपस्थित होते.
No comments