Breaking News

सचिन कांबळे पाटील मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार

Sachin Kamble Patil will file the nomination form showing great strength

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून   सचिन सुधाकर कांबळे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर,  सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ११ वाजता मोठे शक्ती प्रदर्शन करीत, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सचिन कांबळे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

    महायुतीतील जागा वाटपामध्ये फलटण कोरेगाव मतदार संघ हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलेला असून भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सचिन कांबळे पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार असून सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, भव्य शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीतील सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

No comments