फलटण तालुक्यातील जनतेला बदल हवा आहे - मा. खा. रणजितसिंह ; दोन दादा एकत्र आल्याने फलटण मध्ये परिवर्तन अटळ - सचिन कांबळे पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी, फलटण तालुक्यातील राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आज महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोन दादा एकत्र आल्यानंतर फलटण तालुक्याचा उर्वरित विकास निश्चितपणे पूर्ण होईल, त्यासाठीच आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असून, फलटण तालुक्यात निश्चितपणे परिवर्तन होणार असल्याचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष व शिवसेना या महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन करत,राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, शिवरूपराजे खर्डेकर, शिवसेना तालुकाप्रमुख नानासो इवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार नितीन पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सचिन कांबळे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर, आज महायुतीच्या माध्यमातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दादांनी एक नवीन चेहरा दिला असून एक उमद्या कार्यकर्त्याला दादांनी संधी दिलेली आहे, फलटणमध्ये गेली २५ वर्षे घड्याळाच्या चिन्हावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होत आलेले आहेत. आणि यावेळी सुद्धा घड्याळ चिन्हावरील उमेदवारच विजय होईल अशी खात्री आहे.
सचिन कांबळे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे काम करत होते, मात्र महायुतीमध्ये फलटण कोरेगाव मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे, वरिष्ठ पातळीवर विचार होऊन, महायुतीच्या वतीने सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयाचे आम्ही स्वागत केले. कारण सचिन कांबळे पाटील यांनी मागील तीन वर्षापासून मतदार संघात काम करत आहेत, सचिन पाटील हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बागायतदार असून, त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. फलटण तालुक्यातील जनतेला बदल हवा आहे, आणि हा बदल सचिन कांबळे पाटील यांच्या रूपाने फलटण तालुक्याला मिळेल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments