Breaking News

फलटण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात

14 candidates are in the fray in the Phaltan Assembly Constituency elections

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ - फलटण कोरेगाव मतदार संघाच्या निवडणुक।रिंगणात एकूण १४ उमेदवार शिल्लक राहिले असून आज त्यांना उमेदवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, १२ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

    निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे असलेले १४ उमेदवार व त्यांची चिन्हे पुढील प्रमाणे आहेत.

    १) चव्हाण दीपक प्रल्हाद (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) तुतारी वाजवणारा माणूस २) प्रतिभा शेलार (बहुजन समाज पार्टी) हत्ती ३) सचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) घड्याळ ४)आगवणे दिगंबर रोहिदास (राष्ट्रीय समाज पक्ष) शिट्टी ५) प्रा. आढाव रमेश तुकाराम (स्वाभिमानी पक्ष) रोड रोलर ६) चव्हाण दीपक (सनई छत्रपती शासन) ट्रंपेट ७) सचिन जालंदर भिसे (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलेंडर ८) अमोल महादेव करडे (अपक्ष) ऑटोरिक्षा ९) कांचनकन्होजा धोंडीराम खरात (अपक्ष) हिरा १०) कृष्णा काशिनाथ यादव (अपक्ष) बॅटरी टॉर्च) ११) गणेश नंदकुमार वाघमारे  (अपक्ष) ऊस शेतकरी १२) चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव (अपक्ष) बॅट १३) नितीन भानुदास लोंढे  (अपक्ष) टेबल १४) सूर्यकांत मारुती शिंदे (अपक्ष) ग्रामोफोन

No comments