फरांदवाडी येथे मंगल कार्यालयातून अडीच लाखाची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फरांदवाडी तालुका फलटण येथील मयुरेश्वर मंगल कार्यालयात वधू पक्षाच्या खोलीतून अज्ञाताने अडीच लाख रुपये किमतीचे रोख रक्कम दागिने मोबाईल असा मुद्देमाल गायब केला . ही घटना दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली आहे
याप्रकरणी विमल संपत कर्णे वय 60 राहणार अंद्रुड तालुका फलटण जिल्हा सातारा सध्या राहणार मेचनं निवास शिवडी मुंबई यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्राप्त माहितीनुसार दुपारी अडीचच्या दरम्यान वधुपक्षाच्या खोली मधून अज्ञाताने रोख रक्कम आणि दागिने ठेवलेली पर्स गायब केली यामध्ये 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, वीस ग्रॅम चे डोरले 50 हजार रुपये रोख पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आधार कार्ड पॅन कार्ड असा तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हातोहात गायब केला या प्रकरणाचा पोलीस हवालदार आर एस फाळके तपास करत आहेत.
No comments