कत्तलीसाठी चालवलेल्या २ जर्सी गाय व कालवड पकडल्या : दोघांच्या विरोधात गुन्हा
फलटण (गंधर्वता वृत्तसेवा) दि.२९ - वाठार निंबाळकर ता. फलटण गावचे हद्दीत, टेम्पोमध्ये २ जर्सी गाय व एक कालवड, त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था न करता, कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडले असून, याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28/11/2024 रोजी सायंकाळी 05.40 वा. चे सुमारास वाठार निंबाळकर ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी 1) रोहित संजय निकाळजे वय 21 वर्षे रा गिरवी ता फलटण हा 2) इस्लाम हजी शेख रा. आलगुडेवाडी ता फलटण याचे सांगणे वरुन त्याच्या मालकीच्या दोन जर्शी गायीची व एक कालवड स्वतःचे कब्जात असताना, चार चाकी टेम्पो कमांक एम एच ११ एजी ८३१९ या वाहनामध्ये दाटीवाटीने भरुन, त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही सोय न करता व वैद्यकीय तपासणी न करता, जणावरे वाहतुकीचा परवाना नसताना, कत्तलीसाठी घेवुन जात असताना मिळुन आले असून दोघांच्या विरोधात प्राण्यांचा छळ अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व मोटर वाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ हे करीत आहेत.
No comments