Breaking News

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ७१.०५६ टक्के मतदान ; सर्वात जास्त वडजल येथे ८५.२१ तर सर्वात कमी फलटण बूथ नं.१८९

71.056 percent voting in Phaltan Koregaon Assembly Constituency; Highest at Wadjal 85.21 and lowest at Phaltan booth no.189

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ७१.०६ टक्के मतदान झाले आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान वडजल येथे ८५.२१ टक्के झाले तर त्या खालोखाल बरड बागेवाडी येथे ८५.१ टक्के मतदान झाले.त्या खालोखाल ढवळेवाडी ८४.८४ टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान फलटण शहरातील पोलिंग स्टेशन नंबर १८९ येथे ३९.६७ टक्के त्या खालोखाल फलटण शहरातीलच  पोलिंग स्टेशन नंबर १७४ मध्ये ५०.२८ टक्के मतदान झाले आहे.

    फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये ३ लाख ३९ हजार ६६२ मतदारांपैकी एकूण २ लाख ४१ हजार ३७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये एकूण पुरुष १ लाख २६ हजार ३६४ मतदारांनी तर १ लाख १५ हजार ४ महिला मतदारांनी तर  ८ तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  असे एकूण ७१.०६ टक्के मतदान झाले त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

    फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आ. दीपक चव्हाण हे सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असून यापूर्वीच्या तीनही निवडणुका त्यांनी अखंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकल्या आहेत, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.  महायुतीच्या माध्यमातून  सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तिकिटावर  निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तिसरे उमेदवार दिगंबर रोहिदास आगवणे कारागृहातून ही निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लढवत आहेत. त्यांनी यापूर्वी सन २०१४ व सन २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. यावेळी ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. चौथे उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचा मतदार संघात दांडगा संपर्क आहे. ५) उमेदवार प्रतिभा शेलार (बहुजन समाज पार्टी)  ६) चव्हाण दीपक (सनई छत्रपती शासन)  ७) सचिन जालंदर भिसे (वंचित बहुजन आघाडी)  ८) अमोल महादेव करडे (अपक्ष)  ९) कांचनकन्होजा धोंडीराम खरात (अपक्ष)  १०) कृष्णा काशिनाथ यादव (अपक्ष)  ११) गणेश नंदकुमार वाघमारे  (अपक्ष)  १२) चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव (अपक्ष)  १३) नितीन भानुदास लोंढे  (अपक्ष)  १४) सूर्यकांत मारुती शिंदे (अपक्ष)

No comments