Breaking News

जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणाऱ्या फलटण येथील टोळीला केले २ वर्षे तडीपार

A gang from Phaltan who slaughtered and trafficked animals was jailed for 2 years

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७  :  फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) तय्यब आदम कुरेशी यय- ४५ वर्षे, टोळी सदस्य २) आरीस गफुर कुरेशी वय-३६ वर्षे, ३) बिलाल रफिक कुरेशी वय ३४ वर्षे, ४) झीशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी वय २० वर्षे, ५) आबु ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी वय २६ वर्षे, सर्व रा. कुरेशीनगर फलटण जि- सातारा, यांचे टोळीवर फलटण शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० हे कायदे लागु असताना आणि सदर कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास, कत्तलीसाठी वाहतुक करणे, कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करणेस मनाई असताना देखील यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी चाहतुक करताना मिळून आल्यामुळे त्यांचेवर गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. हेमंतकुमार शहा फलटण शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातुन तसेच सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, व पुणे जिल्हयातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती, सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख १) तय्यय आदम कुरेशी वय ४५ वर्षे, टोळी सदस्य २) आरीस गफुर कुरेशी वय-३६ वर्षे, ३) बिलाल रफिक कुरेशी वय-३४वर्षे, ४) झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी वय २० वर्षे, ५) आबु ऊर्फ अत्ताब अफसर कुरेशी यय २६ वर्षे, सर्व रा. कुरेशीनगर फलटण जि-सातारा यांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातुन तसेच सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, व पुणे जिल्हयातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

    नोव्हेंबर २०२२ पासून मपोकाक ५५ प्रमाणे ३३ उपद्रवी टोळयांमधील १०८ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे ३८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १५० इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अचाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

    या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो.हवा बापु धायगुडे, सचिन जगताप, पो.कॉ जितेंद्र टिके, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

No comments