सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ अजितदादा पवार दि.१७ रोजी जाहीर सभा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ : - फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक 17 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची तोफ पुन्हा धडाडणार आहे.
दिनांक 17 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोरेगाव उत्तर मतदारसंघातील पिंपोडे बुद्रुक येथे दुपारी 3 वाजता जाहीर सभा घेणार असून फलटण येथे सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रचाराची जाहीर सभा घेणार आहे. मागील आठवड्यात साखरवाडी येथे अजितदादा पवार यांनी सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभा घेतली होती. आता ते पुन्हा जाहीर सभा घेणार असून या सभेमध्ये काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या सभेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, समशेर सिंह नाईक निंबाळकर, ॲड जिजामाला नाईक निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
No comments