Breaking News

तलवारीने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

Arrested two people who attempted murder by beating with a sword

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - बरड ता. फलटण गावचे हददीत पालखी तळाचे मैदानावर, दिनांक १३/११/२०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुरज लोंढे व त्याचा चुलत भाऊ कार्तिक लोंढे व त्यांचा मित्र प्रथमेश बागाव हे व्यायाम करुन घरी जात असतांना, कुणाल मदने, सौरभ लोंढे, पांडा मसुगडे यांनी तुम्हाला लय मस्ती आली आहे का? आमच्याकडे काय बघताय असे म्हणुन, लोखंडी तलवारीने वार करून, मारहान करुन शिवीगाळ करुन जखमी केले असलेबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र. नंबर १०९०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १०९,११५ (२) वगैरे कलमानुसार दि. १४/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा केल्यानंतर फरारी झाले होते. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे अंकित बरड दूरक्षेत्र याठिकाणी सदर गुन्हयातील आरोपी यांना तात्काळ अटक व्हावी याकरीता जमाव जमला होता. सदर आरोपी यांना तात्काळ अटक करणेबाबत राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे सुनिल महाडिक प्रभारी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी आरोपीत यांना शोध घेणेकामी डीबी पथकाचे श्री. गोपाल बदने पोउनि व बरड दुरक्षेत्राचे शिवाजी जायपत्रे सपोनि यांची दोन पथके तयार करण्यात आली होती. सदर आरोपींचे बाबत पोऊनि बदने यांना गोपनिय बातमी मिळाल्याने सदर गुन्हयातील आरोपी नामे १. कुणाल बंडु मदने २. सौरभ राजेंद्र लोंढे दोन्ही रा. बरड ता. फलटण यांना दुधेबावी ता. फलटण गावचे हददीतील डोंगरातून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी झाले भांडणाचे कारण स्पष्टपणे नमूद केले नव्हते. सदर गुन्हयातील आरोपी यांना अटक केल्यानंतर त्यांनी यातील फिर्यादी व त्याच्या मित्रांनी चार पाच दिवसापूर्वी मारहाण केली होती त्याचा राग मनात धरून सदर आरोपी यांनी फिर्यादी यांना तलवारीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    सदरची कामगीरी मा. समीर शेख सोा, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सोो, अपर पोलीस अधीक्षक, मा. राहूल धस सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक डीबी पथकाचे श्री. गोपाल बदने पोउनि, शिवाजी जायपत्रे सपोनि, पोलीस हवा. नितिन चतुरे, पोहवा. सचिन भोसले, पोना. अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, दत्ता नाळे, पोकॉ. हनुमंत दडस, सपोफौ. संतोष मठपती, पोना. सागर अभंग, यांनी कारवाई केली. सदर गुन्हयाचा तपास मा. राहूल धस सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे करीत आहेत.

No comments