विधानसभेचे उमेदवार प्रा.रमेश आढाव यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आर्थिक मदत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.15 - संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जाशक्ती व तिसऱ्या आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रा. रमेश आढाव सर यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झालेली आहे.
संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून गेले चार महिने स्वखर्चाने समितीतील सर्व सदस्यांनी फलटण तालुक्यातील गावोगावी फिरून सर्व दौरा पार पाडलेला आहे व संपूर्ण मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचे काम केलेले आहे.
प्रचार दौरा करत असताना कुठेतरी आर्थिक बाजू कमकुवत व कमी पडत असल्याचे जानवल्याने त्या विषयीचे सामाजिक भान लक्षात घेऊन, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सचिन रमेश अहिवळे यांनी प्रा. रमेश आढाव सर यांना आर्थिक मदत व्हावी या भावनेतून ( १,५०,०००/- ) दीड लाख रुपये रक्कम दिलेले आहे. जेणेकरून समोरील दोन्ही गट हे पैशाने मजबूत असल्यामुळे, ते त्यांची प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाहीत व जर आपल्याला तालुक्यात बौद्ध समाजाचा आमदार निवडून आणायचा असल्यास, आपलीही प्रचार यंत्रणा कुठेही कमी पडू नये, हे लक्षात आल्याने नगरसेवक सचिन रमेश अहिवळे यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची चैन अशोक ज्वेलर येथे गहाण ठेवली व प्रा. रमेश आढाव सर यांना दीड लाख रुपये मदत केली. व निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न होण्याची तसेच त्याना कोणत्याही स्वरुपात मदत न करण्याची घोषणा केली व संविधान समर्थन समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहण्याची घोषणा केली.
तसेच सोमवार पेठ येथील युवा उद्योजक संजय गायकवाड ( महाराज) यांनीही प्रा. रमेश आढाव सर यांना पन्नास हजार रुपये रक्कम प्रचारासाठी दिल्याबद्दल त्यांचे दोघांचे संविधान समर्थन समिती व समस्त तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.
या दोघांनी जसे सामाजिक भान ठेवून आढाव सर यांना प्रचारासाठी मदत केली तशीच मदत आपल्या समाजातील काही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन करावी. जर कोणाला आपले नाव जाहीर करायचे नसेल तर ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रचारासाठी लागणारे साहित्य किंवा तस्सम स्वरूपातील वस्तू थेट प्रा. आढाव सर यांच्याशी संपर्क करुन मदत करू शकतात. आपण केलेली मदत ही नक्कीच संविधान समर्थन समितीच्या उमेदवाराच्या साठी उमेदवाराच्या प्रचारासाठी हातभार लावणारी व हात बळकट करणारी असेल याचे सर्व तालुक्यातील बौद्ध समाज व इतर समाजानेही लक्षात ठेवावे.
प्रा.रमेश आढाव हे आर्थिक बाजूने इतर उमेदवारांसारखा सक्षम नाही परंतु भविष्यात नागरिकांची व तालुक्याची विकास कामे करण्यासाठी नक्कीच सक्षम आहेत, हे आज तुम्हा सर्वांना या निमित्ताने कळवत आहे.
जर आत्ता जनतेने आढाव सराना मतदान रुपाने मदत केल्यास उद्या कधीही तुम्ही हक्काने आढाव सर याना हाक मारु शकता व काम सांगुन ते करुन घेउ शकता असे सांगतानाच येणाऱ्या २० तारखेला प्रा. रमेश आढाव सर यांच्या रोड रोलरच्या चिन्हा समोरील बटन दाबून समस्त फलटणकारांनी भरघोस मतांनी प्रा. रमेश आढाव सर यांना विजयी करण्यासाठी मतदान करावे व दिनांक 23 रोजी निकाला दिवशी रोड रोलर हा सुसाट वेगाने पुढे जाऊन तालुक्याला नक्कीच एक वेगळी दिशा देण्याचे काम फलटणकर करतील असे प्रतिपादन सचिन अहिवळे यांनी केले.
No comments