मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू ; यंत्रणा सज्ज - प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) २२ - फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली असून, दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळज 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
दिनांक २३/११/२०२४ रोजी मतमोजणीला प्रत्यक्षात सकाळी ठिक ८.०० वाजता सुरुवात होईल. मतमोजणी प्रतिनिधी यांना सकाळी ७.०० वाजलेपासून प्रवेश देणे सुरु होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेची माहिती - ईव्हीएम मतमोजणीसाठी टेबलची संख्या १४ आहे. टपाली मतमोजणीसाठी टेबलची संख्या १० आहे. इटी पी बी एस मतमोजणीसाठी टेबलची संख्या ३ आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी होणाऱ्या फेऱ्या २५. टपाली व इटी पी बी एस मतमोजणीसाठी फेऱ्या १ फेरीमध्ये मतमोजणी पूर्ण होणार. प्रत्येक टेबलला १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहाय्यक, १ मायक्रो ऑब्जर्वर, १ तलाठी, १ शिपाई याप्रमाणे मतमोजणीचा अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलेला आहे.मतमोजणीच्या इतर कामासाठी २०० इतका कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला आहे.
कोणताही अनुचीत प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेणेत आलेली आहे. तसेच अधिकार गृह परिसर व शासकीय धान्य गोदाम परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये ३ लाख ३९ हजार ६६२ मतदारांपैकी एकूण २ लाख ४१ हजार ३७६ मतदारांनी दि.२०/११/२०२४ रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये एकूण पुरुष १ लाख २६ हजार ३६४ मतदारांनी तर १ लाख १५ हजार ४ महिला मतदारांनी तर ८ तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
No comments