फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला दादांचा वादा ; राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला फलटण येथे अद्यावत आरोग्य सुविधा, सर्वांगीण शिक्षणाचा पायाभरणी, दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधा, शेती व शेतकऱ्यांचे विकास, सामाजिक प्रगती विकासाचा वादा अजितदादा यांनी दिला असल्याचे सचिन पाटील यांनी फलटण येथे सांगितले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनोख्या पद्धतीने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा ऑनलाइन पध्दतीने मतदारसंघनिहाय जाहीरनामा करण्यात आला.
फलटण कोरेगाव मतदार संघात देखील हा जाहीरनामा ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे उपस्थित होते.
जाहीरनाम्यात लाडकी बहिण योजनेची रक्कम रुपये २१०० पर्यंत वाढवणे, शेतकरी कर्जमाफी, भातशेतकऱ्यांसाठी रुपये २५००० प्रति हेक्टर बोनस, २.५ दशलक्ष नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५००० 'पाणंद' रस्त्यांचे बांधकाम करण्याची आश्वासने देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने निवडणूक लढवत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी जाहीरनामा जाहीर केला. कार्यक्रमांच्या मालिकेत जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आले; राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत आहीरनामा, तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदियात जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले.
अजित पवार यांनी बारामती या त्यांच्या मतदारसंघात बारामतीसाठी, पक्षाचा राज्यस्तरीय जाहीरनामा आणि मतदारसंघ जाहिरनामा या दोन्हींचे अनावरण केले. पहिल्यांदाच, पक्षाने लढत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी पक्षाचा जाहीरनामा लाँच केला. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'सरकार स्थापनेच्या 100 दिवसांत नवीन महाराष्ट्राचे व्हिजन आम्ही मांडू.' असे आश्वासन देण्यात आले.
माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या रुपये 1,500 वरून प्रति महिना रुपये 2,100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा मासिक DBT हस्तांतरण असेल जो 2.3 कोटी महिलांना प्रतिवर्ष रुपये 25,000 चा लाभ देईल.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 11 नवीन आश्वासने आहेत, ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन रुपये 1500 वरून रुपये 2100 प्रति महिना वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी, पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रतिवर्ष रुपये 12,000 वरून रुपये 15,000 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत आणि एमएसपी अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्व पिकांसाठी 20% अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही सांगितले आहे. याशिवाय थान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.
कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांनी बरीच आश्वासने दिली तुम्ही अर्थमंत्री आहात हा डोलारा त्यांना सांभाळता येइल का यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासने दिली आहेत, त्यामधील बहुतांशी आश्वासने ही सांभाळता येण्यासारखी आहेत. आपण आपल्या राज्याचे उत्पन्नाचे मार्गही वाढवायचे असतात. ज्यावेळेस आम्ही अर्थसंकल्प सादर करतो, त्यावेळी हा विचार नेहमी करत असतो की बचत करताना त्याचा परिणाम सर्वसामान्य घटकावर होणार नाही व बचतीनंतर त्या योजनांना निधी मिळेल. काल परवा आपण विरोधी पक्षांची भाषणे ऐकली. ते आमच्यावर आरोप करतात की एवढ्या घोषणा प्रत्यक्षात कशा येणार, या घोषणा प्रत्यक्षात यायला राज्य कर्जबाजारी होईल किंवा राज्य कंगाल होईल व आम्ही दिलेली जी आकडेवारी त्यांनी ती आणखीन वाढवली आहे. राज्यातील सर्व प्रकल्प गुजरात मध्ये गेले अशा टीका आमच्यावर विरोधक करतात त्या चुकीच्या आहेत. विरोधकांच्या वेगवेगळ्या योजना ज्या आर्थिक भार देणाऱ्या आहेत, अशा प्रकारच्या योजना त्यांनी सादर केल्या आहेत. परंतु अर्थ मंत्रालयातला माझा दहा वर्षाचा अनुभव पाहता त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना त्यांना करताच येऊ शकणार नाहीत. केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नसल्यामुळे केंद्राकडून भरीव अशा प्रकारची मदत ही राज्याला मिळायला हवी ती त्या बाबतीत त्यांना मिळू शकत नाही. आमचं मात्र उलट आहे आम्हाला मदत मिळू शकते, हे आंध्र व बिहारच्या उदाहरणावरून आपण सगळे पाहता. त्यामुळे आम्ही जाहीर केलेल्या योजना आम्ही निश्चितपणे चालवू असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments