मतमोजणीमुळे शासकीय गोडाऊन परिसरातील वाहतूक बंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी असून, फलटण कोरेगाव मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोडाऊन फलटण येथे, सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मतमोजणीच्या ठिकाणी वाहतुक कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून या परिसरातील खाजगी वाहतूक बंद करण्यात असून त्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत शासकीय धान्य गोडाऊन, फलटण, येथे दिनांक २३/११/२०२४ रोजी सकाळी ०७,०० वा. चे पासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दिनांक २३/११/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मतमोजणीचे ठिकाणी वाहतुक कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून खाली दर्शविले प्रमाणे वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे.
दिनांक २३/११/२०२४ रोजी सकाळी ०४.४५ ते १८.०० वाजेपर्यंत सदर रस्त्यावरील वाहतुकीच्या मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
१. गिरवी नाका ते धनगरवाडा कडे येणारी जाणारी वाहतुक धनगरवाडा ते कॉलेजरोड येथून रिंगरोडने धनगरवाडा बाजूकडे.
२. धनगरवाडा ते गिरवी नाकाकडे येणारी जाणारी वाहतुक धनगरवाडा ते कॉलेजरोड येथून रिंगरोडने गिरवी बाजूकडे.
३. गिरवी नाका ते महात्मा फुले चौककडे जाणारी-येणारी वाहतुक लाकडी चौकातून डेक्कन बाजूकडे.
४. महात्मा फुले चौक ते गिरवी नाकाकडे येणारी-जाणारी वाहतुक डेक्कन चौक ते लाकडी चौक ते रिंगरोड बाजूकडे.
५. रेस्ट हाऊस कॉर्नर ते डेक्कन चौक व मालोजीराजे पुतळा ते महात्मा फुले चौक मार्ग पुर्णपणे वाहतुकीस बंद (शासकीय वाहने वगळून) करण्यात येत आहे.
No comments