Breaking News

वृद्ध पती-पत्नीचा घरामध्ये धुराने गुदमरून मृत्यू

Elderly husband and wife die of smoke suffocation at home

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 18 :   मौजे सांगवी तालुका फलटण येथे वृद्ध पती-पत्नीचा घरामध्ये नायलॉन कापड पेटून धूर होवून धुराने गुदमरून मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलिसांना झाले आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

    फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 17/11/2024 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची आई रतन दशरथ सावंत (वय 68 वर्ष) व वडील दशरथ दुर्गा सावंत (वय 75 वर्ष दोघे रा. सांगवी, ता. फलटण जि. सातारा) राहत असलेल्या खोलीचा दरवाजा बराच वेळ वाजवुन देखील आतुन न उघडल्यामुळे फिर्यादी यांच्या पत्नीने जोराचा धक्का देऊन उकलला असता दरवाजा किंचित उघडल्यानंतर घरातील गॅस शेगडीजवळील कापड जळालेले व घरामध्ये सर्वत्र धुर पसरलेला दिसला. तसेच फिर्यादी यांची आई गॅसशेगडी व त्याशेजारील देव्हा-या जवळ आणि वडील खोलीच्या मुख्य दरवाजाजवळ निपचित पडलेले दिसले.

    सदरची घटना समजल्यानंतर फिर्यादी लगेचच सांगवीला घरी येऊन त्यांनी पाहिले असता फिर्यादी यांची आई गॅसशेगडी व देव्हा-याजवळ आणि वडील दरवाजाजवळ निपचित पडलेले होते. त्यांच्या शरीराची संपुर्ण हालचाल बंद होऊन ते मयत झाले होते. घरामध्ये जळाल्यासारखा धुरकट बास येत होता. गॅसशेगडीजवळील कापड जळालेले दिसत होते. फिर्यादी यांनी त्यांच्या आईवडीलांची बारकाईने पाहणी केली असता आईच्या पोटावरील त्वचा थोडीशी निघालेली होती. परंतु दोघांच्या अंगावरील कपडे जळालेले नव्हते. काहीवेळातच तेथे अॅम्ब्युलन्स आल्यानंतर फिर्यादी यांच्या आईवडीलांचे प्रेत अॅम्ब्युलन्समध्ये ठेवुन ते फलटण येथील सरकारी दवाखान्यात नेले. सदर प्रकरणी घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

    या प्रकरणी सदर दोघांचा मृत्यू धुराने गुदमरून झाला असेल  बाबत डॉक्टर यांनी सांगितले आहे तरी व्हीसेरा काढून ठेवला आहे तपासणी साठी फॉरेन्सिक लैब पुणे येथे पाठवत आहोत सदर ठिकाणी स्वतः पोलिस निरीक्षक सुनील महाडीक सर्व अधिकारी स्टाफ यांनी तात्काळ माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली सदर ठिकाणी सिलेंडर स्पोट झाला अशी माहिती होती पण भेट दिले नंतर सदर ठिकाणीस्फोट झाला नसून घरामध्ये नायलॉन कापड पेटून धूर झाला होता त्या धुराने गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तपास बाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी मार्गदर्शन केले तसेच अप्पर पोलिस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर  पोलिस अप अधीक्षक राहुल धस यांनी समक्ष भेट देऊन तपासास मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक अरुण देवकर एलसीबी डॉग स्क्वाड फिंगर प्रिंट फॉरेन्ससीक टीम ने घटनस्तळी भेट देऊन पुरावे तपासले सदर बाबत अधिक तपास सुरू आहे व्हीसेरा रिपोर्ट आले नंतर मृत्यू नेमका कशाने झाला हे कळेल अधिक तपास पोलिस अप निरीक्षक. पाटील करत आहेत अशी माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली आहे.

No comments