विधानसभा निवडणूक तक्रार प्रकरणी सचिन पाटील यांच्यासह तिघांना नोटीस
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने आदर्श आचार संहितेचे अंमलबजावणी काटेकोरपणे होणे करीता २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघांतर्गत ६ भरारी पथकाची नियुक्ती करणेत आलेली आहे. दरम्यान आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने १.अक्षता मंगल कार्यालय २. महाराजा मंगल कार्यालय व्यवस्थापक ३. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांना नोटीस इशू करण्यात आल्या असुन, खुलासा २४ तासात मागवला असल्याचे तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
आज दिनांक ०७/११/२०२४ रोजी दूरध्वनीव्दारे आलेल्या दिवाळी साहित्य वाटपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील भरारी पथक क्र.६ यास तक्रारीच्या ठिकाणी म्हणजेच मलटण येथील श्री. पांडुरंग गुजवंटे व बारदानवाले पवार यांचे राहते घर व गोडावून या ठिकाणी भरारी पथकाने भेट देवून परिसराची पाहणी केली. सदर पाहणी अंतर्गत पथकास काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
आज दिनांक ०७/११/२०२४ रोजी दूरध्वनीव्दारे आलेल्या दिवाळी साहित्य वाटपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील भरारी पथक क्र.५ व ६ यास तक्रारीच्या ठिकाणी म्हणेजच अक्षदा मंगल कार्यालय ठाकुरकी येथे भेट दिली असता मंगल कार्यालय व परिसराचे पाहणी व चित्रीकरण करण्यात आले असता कार्यालयाच्या डायनिंग हॉलच्या रुममध्ये २०० पिशव्या दिवाळी साहित्याच्या मिळूण आल्या सदरच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आज दिनांक ०७/११/२०२४ रोजी दूरध्वनीव्दारे आलेल्या दिवाळी साहित्य वाटपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील भरारी पथक क्र. ६ यास तक्रारीच्या ठिकाणी म्हणेजच महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे भेट दिली असता, मंगल कार्यालय व परिसराचे पाहणी व चित्रीकरण करण्यात आले असता कार्यालयात गुलाबी रंगाच्या प्लास्टिक पिशव्या ४ नग ज्यावर पुढे व मागे दादाची लाडकी बहीण एका स्त्रीचा फोटो, घड्याळाचे चिन्ह, मा. अजितदादा यांचा फोटो तसेच २ प्लॅस्टिीक पाकीट व लेस व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचार प्रसिध्दी पत्रक मिळून आले सदरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
No comments