पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपोंडे बुद्रुक व नांदवह येथे मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपोडे बु. येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेत मजुरांना मतदान हक्क बजावण्या बाबत दिली माहिती. 20 नोव्हेंबर होणाऱ्या मतदान प्रक्रीयेचे पटवून देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांनी सांगितले.
नांदवळ मध्ये गृहभेटीद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव यांनी नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनिस, तलाठी, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) उपस्थिती होते.
No comments