Breaking News

राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक -जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

Pre-certification of Political Advertisements Mandatory - District Election Officer Jitendra Dudi

    सातारा  -   विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने प्रचारासाठी जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.   सोशल मीडिया हे सुध्दा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या श्रेणीत येत असल्यामुळे सोशल मीडियावरील सर्व राजकीय जाहिराती देखील पूर्व प्रमाणित करणे आवश्यक आहे.  बल्क एस.एम.एस. व्हॉईस एस.एम.एस.. इलेक्ट्रॉनिक मीडिया, टिव्ही, केबल चॅनल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ व्हिज्युअल यासह सोशल मिडीयावरून देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रसिद्धपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच मतदान पूर्व दिवशी व मतदानाच्या दिवशी प्रिंट मीडियातून प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींही दोन दिवसापूर्वी माध्यम व सनियंत्रण कक्षाकडून प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
    माध्यम प्रमाणिकरण समितीकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करताना प्रत्येक नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष व निवडणूक लढवणारा उमेदवार यांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी ३ दिवस आधी समितीकडे अर्ज करावा. तसेच, इतर व्यक्ती किंवा नोंदणी न केलेल्या राजकीय पक्षाच्या बाबतीत जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी ७ दिवस आधी समितीकडे अर्ज करावा.
    विहित नमुन्यातील अर्जासह प्रचार मजकुराची दोन प्रतीत साक्षांकित संहिता (स्क्रिप्ट), प्रचार मजकुराच्या दोन पेनड्रायु/सीडी द्याव्यात. सीडी, प्रचार साहित्य निर्मिती कर्ता व प्रकाशकाचे नाव पत्ता, संपर्क क्रमांक, दिनांक सीडीमध्ये तसेच संहितेमध्ये असावे. जाहिरातीमध्ये  जुने फोटो अथवा चित्रीकरण वापरले असल्यास त्यावर संग्रहीत लिहीणे बंधनकारक आहे.
    अर्जामध्ये जाहिरात निर्मितीचा व प्रसारणाचा अंदाजित खर्च, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या, केबल, रेडिओ, सोशल मीडिया यावर करावयाच्या प्रक्षेपणासंबंधीतील तपशील, जाहिरात उमेदवाराच्या लाभासाठी करण्यात येत आहे किंवा राजकीय पक्षाच्या लाभासाठी करण्यात येत आहे याबाबत सत्यापन, जर याप्रमाणे नसल्यास तशा आशयाचे प्रतिज्ञापन, सर्व प्रदाने धनादेश किंवा धनाकर्षने दिली जातील, याचे सत्यापन देणे आवश्यक आहे.
    चेकलिस्ट -
    1) विहीत नमुन्यातील अर्ज. 2) उमेदवाराने प्रतिनिधी नियुक्त केला असल्यास तसे प्रतिनिधीच्या नियुक्तीचे उमेदवाराच्या सहीचे पत्र जोडावे. 3) प्रचार मजकुराची संहिता (स्क्रिप्ट) दोन प्रतीत. 4) प्रचार मजकुराच्या दोन सीडी / पेन ड्राईव्ह. 5) प्रचार साहित्य निर्मिती कर्त्याचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक सीडी / पेन ड्राईव्हमध्ये नमूद असावा. 6) पेन ड्राईव्ह प्रचार साहित्य निर्मिती खर्चाबाबत बील अदा केल्याची पावती. 7) प्रचार साहित्यामध्ये, संहितेमध्ये तसेच सीडीमध्ये प्रकाशक, दिनांक तसेच त्यांचा संपर्क क्रमांक आवश्यक.  जाहिरातीमध्ये जुनेफोटो  चित्रिकरण वापरले असल्यास त्यावर संग्रहीत लिहीणे बंधनकारक.
    राजकीय जाहिराती प्रमाणित करताना खालील बाबींना अनुमती दिली जाणार नाही 1) इतर देशांवर टीका. 2) धर्म किंवा समुदायांवर हल्ला. 3) काहीही अश्लील किंवा बदनामीकारक. 4) हिंसाचाराला उत्तेजन देणे. 5) न्यायालयाचा अवमान करणारी कोणतीही गोष्ट 6) राष्ट्रपती आणि न्यायपालिकेच्या सचोटीविरुद्ध नाराजी 7) राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता प्रभावित करणारी कोणतीही गोष्ट कोणत्याही व्यक्तीच्या नावाने खासगी जीवनाच्या पैल्युवर टीका. प्राणी मुलांच्या वापरावर प्रतिबंध, संरक्षण कर्मचाऱ्यांची छायाचित्रे आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्या कार्यांची छायाचित्रे या बाबींचे तंतोतंत पालन करावे.
    प्रिंट मिडीया मध्ये मतदान दिवसाच्या आधी व मतदान दिवशी प्रसारीत करणाऱ्या जाहिराती दोन दिवसापूर्वी पुर्व- प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
 

No comments