Breaking News

फलटण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर

Schedule for verification of expenditure records of candidates in Phaltan Vidhan Sabha Constituency has been announced

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ -  255-फलटण विधानसभा मतदार संघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा  तपासण्याचे  वेळापत्रक  फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी जाहीर केले आहे. सकाळी 3 ते5 या वेळेत 9 नोव्हेंबर प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर  रोजी  द्वितीय  तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी 255-फलटण मतदारसंघ फलटण विधानसभा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष फलटण येथे होणार आहे.

    तपासणी एकतर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचिरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.

No comments