Breaking News

सचिन पाटील यांना मतदान करून विकासाला साथ द्या : माजी मंत्री खुबा

Support development by voting for Sachin Patil: Former minister Khuba

          फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ : - फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघांमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील म्हणजेच तुमच्या सर्वांचे  माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच उमेदवार आहेत असे समजून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि विकासाला साथ द्या असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी केले.

    कोळकी येथे आयोजित कोपरा सभेमध्ये माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,जयकुमार शिंदे, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा, , लतीफ तांबोळी, बाळासाहेब काशीद, ॲड. संदीप कांबळे, संदीप नेवसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू – भगिनी उपस्थित होते.

    माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरासह विधानसभा मतदार संघांमध्ये अनेक विकास कामे त्यांच्या काळामध्ये मार्गी लावलेली आहेत. काही कारणास्तव त्यांचा पराभव झाला असला तरी केंद्रीय नेतृत्वामध्ये माजी खासदार रणजितसिंह यांचे वजन अतिशय चांगले आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खुबा यांनी केले आहे.

    माजी खासदार रणजितसिंह म्हणाले, फक्त ५ वर्षाच्या खासदारकीच्या कालावधीमध्ये फलटण शहरासह तालुक्याचा गत पंचवीस वर्षांच्या राहिलेल्या विकासाचा बॅकलॉग आपण भरुन काढला आहे. काही कारणास्तव आपला पराभव झाला असला तरी राज्य व केंद्राच्या नेतृत्वामध्ये आपले संबंध अतिशय चांगले असल्याने आगामी काळात या मतदार संघाच्या विकास प्रक्रियेत खंड पडणार नाही.

    फलटण विधानसभेमधून सचिन सुधाकर पाटील यांना घड्याळ या चिन्हावर मतदान करुन महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघांमधून निवडून पाठवावे, फलटण मतदार संघांमध्ये राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असून आगामी काळामध्ये विकास कामांच्या बाबतीत कमी पडणार नाही असे स्पष्ट आश्वासन यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

    मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य रियाज इनामदार यांनी स्वागत, प्रास्ताविक व आभार मानले.

No comments