अजितदादांनी केलेले आरोप निरर्थक असून, अपुऱ्या माहितीमुळेच त्यांनी आरोप केले - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
कमिन्सच्या कामगारांचा पगार, आमच्या घरात येत असेल तर आम्ही राजकारणाचा संन्यास घेऊ - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 18 : – कमिन्स कंपनीमधील कामगारांचा एक रुपया जरी आमच्या घरात येत असेल हे सिद्ध झाले तर तर आम्ही राजकारण सोडू अन्यथा तुम्ही राजकारण सोडा आमच्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे निरर्थक आणि हास्यास्पद असल्याची घणघणाती टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केली.
आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या सांगता सभेसाठी आले होते, त्यावेळी फलटणमधील राजे गटाच्या ताब्यात असलेल्या संस्था विषयी व कमिन्स कंपनी विषयी त्यांनी राजे गटावर जोरदार आरोप केले होते.
त्यावर आज लगेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद प्रतित्यूर देऊन. अजितदादांनी केलेले आरोप निरर्थक असून, अपुऱ्या माहितीमुळेच त्यांनी आरोप केले त्याचे सांगितले.
औद्योगिक वसाहतीमधील कमिन्स कंपनी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामंतिक कंपनी आहे.त्यामुळे त्यांचे पगार थेट बँकेत होत असतात.कमिन्स कंपनी मधील कामगारांची कपात केलेले पैसे आमच्याकडे येतात हे आरोप धांदात खोटे असून हे आरोप जर सिद्ध झाले तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि जर तुम्ही हे आरोप सिद्ध नाही केले तर तुम्ही राजकारण सोडा असे आव्हान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. कमिस मधला पगार कामगारांना कसा होतो याचे पुरावे देखील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी पत्रकारांना दाखविले.
गोविंद डेअरीचे सांडपाणी हे नीरा नदीत सोडले जात नाही आमच्याकडे यावर प्रक्रिया करणारा उद्योग असून , तो आपण पहावा उगाच खोटे आरोप करू नये. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम चांगले असून, दिवाळीत सुद्धा कामगारांना अँडव्हान्स पगार देण्यात आलेला आहे. आमच्या ताब्यातील सर्व संस्था चांगल्या चालल्या असून तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. तुमच्याकडे सल्ल्यासाठी आल्यास तुम्ही संस्था गिळंकृत करता असे श्रीमंत संजीवराजे यांनी ठणकावताना. कोरेगावचा जरंडेश्वर साखर कारखाना सहकारी होता तो खाजगी कसा झाला आणि श्रीराम हा सहकारी होता आणि सहकारीच कसा राहिलेला आहे हे बघा असाही टोला त्यांनी लगावला.
फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर्वीपासूनच सीबीएससी पॅटर्नच्या इंग्रजी शाळा सुरू आहेत त्यामुळे या शाळा सुरू नसल्याचा आरोप धांदात खोटा आहे. आमच्याकडे मोकळे मैदानी व क्रीडांगणे मोठ्या प्रमाणात असून अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश प्राप्त केले आहे. अनेक जण हॉकी कुस्ती कबड्डी स्पर्धांमध्ये देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहेत. फलटण तालुक्यातील अनेक कामगार बारामती मध्ये औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे असल्यामुळे तेथे कामाला जातात यात गैर काहीच नाही. फलटण मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कंपन्या येणार असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीराम सहकारी साखर कारखाना व जवाहर कारखाना हा संयुक्त भागीदारीतून श्रीराम कारखाना चालवत आहेत या कारखान्याबरोबर केलेला करार फायदेशीर ठरला असून कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मे. टन झालेली आहे पुढील वर्षी दहा हजार मे. टन करण्याचा आमचा उद्देश आहे. ऊस उत्पादकांचे पैसे स्पर्धात्मक दराप्रमाणे वेळच्या वेळी दिले जात आहेत कारखाना चांगला सुस्थितीत असून या कारखान्याचे बद्दल केलेले आरोप निरर्थक आहेत. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त पैसे देण्यात यावे म्हणून आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.
खासदार शरद पवार यांच्या फलटण मधील सभेला तांत्रिक कारणामुळे आमदार रामराजे नाईक निंबाळकर आलेले नाही आणि आमदार रामराजे हे कोणामुळे आमदार आहेत हे सर्व जनतेला माहिती आहेत असा टोलाही श्रीमंत संजीवराजे यांनी लगावला.
No comments