Breaking News

भगवान सॉमिल,फलटण येथे दुचाकीची दुसऱ्या दुचाकीस धडक ; एक गंभीर जखमी

Two-wheeler collides with two-wheeler at Bhagwan Sawmil, Phaltan; One seriously injured

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - फलटण - लोणंद रोडवर, भगवान सॉ मिल जवळ, फलटणकडून लोणंदकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनास  दुसऱ्या दुचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने, झालेल्या अपघातात दुचाकी वरील इसम गंभीर जखमी झाल्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात.

    फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३/११/२०२४ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फलटण कडुन लोणंदकडे जाणाऱ्या रोडवर भगवान सॉमिलसमोर, मंगळवारपेठ, फलटण, ता.फलटण येथे  विजय पांडुरंग कोरपडे, वय ४५ वर्षे, रा. बोरावकेवस्ती, बारामती रोड,अलगुडेवाडी, ता. फलटण, जि. सातारा हे त्यांची होंडा शाईन मोटारसायकल एम एच ११ डीजे ६८५१  वरून फलटण कडून लोणंद कडे जात असताना, त्यांना एका अनोळखी मोटार सायकलवरील अज्ञात चालकाने हयगयीने, निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवुन त्यांना गंभीर जखमी करून त्यांना औषधोपचाराकरीता न नेता तेथुन मोटारसायकवरून निघुन गेला असल्याची फिर्याद दि.२८/११/२०२४ रोजी सुनिल यशवंत लोणकर,  रा. आसु रोड अलगुडेवाडी, ता. फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ या करीत आहेत.

No comments