Breaking News

गोविंद मिल्कच्यावतीने फलटण येथे दि. ३१ डिसेंबर रोजी : शहरात सायंकाळी ५ ते ६ यावेळेत दूध वाटप

Govind Milkhyawathi at Phaltan. On 31st December: Milk distribution in the city between 5 pm and 6 pm

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० : सरत्या वर्षाला निरोप देताना उद्या मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी फलटण येथे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण, निकोप हॉस्पिटल फलटण, फलटण डॉक्टर्स असोसिएशन, फलटण नगर परिषद आणि फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त सहभागाने शहरात ४ ठिकाणी दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    सुंदर फलटण, निरोगी फलटण, सुरक्षित फलटण ही घोषवाक्य घेऊन सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे. 

    उद्या मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळात शहरातील ४ ठिकाणी गोविंद मिल्कच्या वतीने दुधाचे वाटप करुन आरोग्यासाठी दुधाचा आहार किती आवश्यक आणि उत्तम आहे याचे महत्त्व पटवून तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात येणार आहे. 

    फलटण शहरात खालील ठिकाणी दुधाचे वाटप करण्यात येणार आहे 
१) नाना पाटील चौक येथे सायंकाळी ५.०० ते ५.१५,
२) आंबेडकर चौक येथे सायंकाळी ५.१५ ते ५.३०,
३) डी. एड. चौक येथे सायंकाळी ५.३० ते ५.४५ आणि

४) महात्मा फुले चौक येथे सायंकाळी ५.४५ ते ६.०० यावेळेत फलटण शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि फलटण शहरातील तरुण पिढीला आपल्या आरोग्यासाठी काय आवश्यक आहे आणि व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर काय होतात याबाबत निकोप हॉस्पिटलचे डॉ. जे. टी. पोळ युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दि. ३१  डिसेंबर रात्रीच्यावेळी फलटण शहरातील नागरिकांना शांतता भंग होऊन कोणताही त्रास होऊ नये, काही अपघात होऊ नये, आणि कायदा व सुव्यवस्था शहरात उत्तम रहावी यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे हे मार्गदर्शन करुन व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला युवकांना देणार आहेत.

    फलटण शहरामध्ये दि. ३१ डिसेंबरच्या रात्री कायदा आणि सुव्यवस्था उत्तम रहावी आणि कोणत्याही प्रकारचे दंगा गडबड गोंधळ न करता सर्व नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्षाचा आनंद घेता यावा यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक  यशवंत नलावडे यांनी सांगितले आहे.

No comments