Breaking News

राजे गटाचे साखरवाडी ग्रामपंचायतीचे ५ सदस्य अपात्र

5 members of Sakharwadi Gram Panchayat of Raje group disqualified

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५:- साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य  विक्रमसिंह भोसले यांनी जोरदार धक्का देत राजे गटाचे ५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र केले असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ह) अन्वये(मुदतीत ग्रामपंचायत कर मागणी भरणा न केल्याने) जिल्हाधिकारी सातारा यांनी सदस्य अपात्रबाबत आदेश लागू केले आहेत.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रमसिंह भोसले यांनी जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे विवाद अर्ज दिनांक ९/१२/२०२२ रोजी दाखल केला होता. त्यांची सुनावणी जिल्हाधिकारी सातारा यांचे समोर झाली. त्यांचा निकाल दिनांक २९/११/२०२४ रोजी देण्यात आला असून, विक्रमसिंह भोसले यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात केलेले पाच अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

    जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्णयामुळे विद्या विलास भोसले, मच्छिंद्र बापुराव भोसले, सुनंदा तुकाराम पवार,लक्ष्मी उर्फ मनिषा अंकुश माने,गौरीदेवी राजेंद्र माडकर हे पाच ग्रामपंचायत सदस्य यांना सदस्य म्हणून राहणेस अपात्र करणेत आले असून, विक्रमसिंह भोसले यांचेमार्फत ॲड. आप्पासाहेब नामदेव जगदाळे व ॲड.देवदत्त आप्पासाहेब जगदाळे यांनी युक्तिवाद केला होता.

No comments